Home संगमनेर इंदुरीकर महाराजांचं ट्रोलर्संना सडेतोड उत्तर; लेकीच्या राजशाही साखरपुड्यावरून डिवचणाऱ्यांना स्पष्टच सांगितलं

इंदुरीकर महाराजांचं ट्रोलर्संना सडेतोड उत्तर; लेकीच्या राजशाही साखरपुड्यावरून डिवचणाऱ्यांना स्पष्टच सांगितलं

Breaking News | Sangamner | Indurikar Maharaj: इंदुरीकर महाराजांनी लेकीच्या साखरपुड्यात लाखो रुपये खर्च केल्याने सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका.

Indurikar Maharaj's blunt reply to trolls

संगमनेर: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज सध्या चर्चेत आले आहेत त्यांच्या लेकीच्या राजेशाही साखरपुड्यावरून.  आपल्या विनोदी शैलीने आणि मार्मिक भाष्य करत साधेपणाने लग्न करण्याचा उपदेश करणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी लेकीच्या साखरपुड्यात लाखो रुपये खर्च केल्याने सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.   या टीकेला आता इंदुरीकर महाराजांनी उत्तर दिलं आहे. ” एवढ्या मोठ्या पद्धतीने साखरपुडा हा तुम्हाला दाखवण्यासाठीच केला, की आपण बदल करू शकतो. बदल करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. ” असं इंदुरीकर महाराज म्हणाले.

संगमनेर तालुक्यातील मूळ रहिवासी असलेले कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर हे गेल्या दोन दशकांपासून आपल्या विनोदी शैलीने आणि थेट  बोलण्याच्या पद्धतीमुळे प्रचंड लोकप्रिय झाले. समाजातील वाईट रूढी परंपरा व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, गुन्हेगारी, वृत्तीवर ते कायम प्रहार करताना दिसतात. त्यांच्या काही विधानांवरून वेळोवेळी वादही उद्भवले आहेत. आता वैयक्तिक आयुष्यातील सोहळ्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

इंदुरीकर महाराज म्हणाले,” मला तक्रार आली की मी हे लग्न साध्या पद्धतीने करा असं सांगतो आणि मुलीचा साखरपुडा थाटामाटात केला.  वीस वर्षे लोकांनी नाव ठेवली तेच सहन करत आलो. पण आता इथून पुढे विशिष्ट व्यक्तीचा सत्कार करायचा नाही असा बदल करण्याचं ठरवलं. करायचा तर सगळ्यांचाच नाहीतर एकाचही नाही. एवढ्या मोठ्या पद्धतीने साखरपुडा हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला. की आपण बदल करू शकतो. बदल करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. साखरपुड्यात जेवण महाराष्ट्रीयन पद्धतीने ठेवलं. चायनीज वगैरे आपल्याकडे चालणार नाही. त्याच्यासाठी आठ दिवस वाद केला पण जेवण महाराष्ट्रीयनच ठेवलं. जेवण वाढणाऱ्यांचा ड्रेस वारकऱ्यासारखा ठेवला. कारण सगळ्यांना समान वागणूक. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खुर्ची नाही. ज्याला आजार आहे त्यांनीच खुर्चीवर बसायचं. वारकरी संप्रदायाने जगाला एकात्मता आणि संघटन कौशल्य शिकवले. कोणाला कमी पाहिलं नाही. कोणाची स्तुती केली नाही. निंदा केली नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. लोकांचा आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचलो.” असं स्पष्टीकरण इंदुरीकर महाराजांनी दिलं.

इंदुरीकर महाराज यांच्यावर काय होते टीका-

साधेपणाने लग्न करण्याचा उपदेश देणारी इंदुरीकर महाराज यांनी स्वतःच्या लेकीच्या साखरपुडातच लाखो रुपये खर्च केल्याचा समोर आल्याने जे इतरांना सांगतात ते स्वतःही आचरणात आणावं असं म्हणत मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी इंदुरीकर महाराजांवर टीका केली.  यावरून आता इंदुरीकर महाराजांनी उत्तर दिलं आहे.

Breaking News: Indurikar Maharaj’s blunt reply to trolls

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here