Home नाशिक नाशिक ब्रेकिंग! पाच जणांचा पाण्यात्त बुडून मृत्यू

नाशिक ब्रेकिंग! पाच जणांचा पाण्यात्त बुडून मृत्यू

Nashik Breaking: दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यातून समोर आल्या आहेत.

Nashik Five people drowned in water

सटाणा: तालुक्यातील देवळाणे येथील रातीर शिवारातील स्वत:चेच शेततळे पाहण्यासाठी गेलेल्या दोन मुलींपैकी एकीचा पाय घसरून पाण्यात पडल्याने तिला वाचविण्यासाठी गेलेल्या दुसरीचा पाण्यात बुडून दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे देवळाणे व कुपखेडा गावावर शोककळा पसरली आहे.

कुपखेडा गावातील श्रावणी ठाकरे ही आपल्या आत्त्याच्या गावी देवळाणे येथे आली असता, आत्याची मुलगी ऋतुजा देवरे व श्रावणी ठाकरे या दोघी शेतातील शेततळे पाहण्यासाठी गेल्या असता ऋतुजाचा पाय घसरून ती शेततळ्यात पडली. तिला वाचवण्यासाठी श्रावणी गेली असता दोघींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

दोघी मुली घराकडे का येत नाही याचा शोध ऋतुजाच्या कुटुंबीयांनी घेतला असता, दोघी शेततळ्यात बुडाल्याचे समजल्या नंतर त्यांनी परिसरातील ग्रामस्थांना घटना कळविली. दुर्दैवाने दोघींचा या घटनेत मृत्यू झाला. गावकऱ्यांनी दोराच्या सहाय्याने दोघींना तलावाबाहेर काढले. सटाणा ग्रामीण रूग्णालयात दोघींचे शवविच्छेदन करण्यात आले.

ऋतुजा इयत्ता नववीत तसेच श्रावणी इयत्ता दहावीत शिक्षण घेत होती. ऋतुजा व श्रावणी एकुलत्या एक मुली असल्याने देवळाणे येथील देवरे व कुपखेडा येथील ठाकरे कुटुंबासह परिसरात शोककळा पसरली आहे. नामपूर पोलिसांतर्फे पुढील तपास पोलिस करण्यात आहे .

नांदगांव:  मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या मुलांला वाचवण्यासाठी गेलेल्या आई व मामाचा पाण्याच्या खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 26) दुपारी घडली. तालुक्यातील बाणगाण बुद्रुक येथील घडली. मयतांमध्ये 15 वर्षीय तरुण आणि 35 वर्षीय महिला व 29 वर्षी य पुरुषांचा समावेश आहे.या प्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

नांदगाव तालुक्यातील बाणगाव नदी किनारी मेंढ्या चारतांना वाल्मीक बापू इटनर (वय 15) हा मेंढी धुत असताना खोल पाण्यात पडला त्यास वाचविण्या साठी त्याची आई इंदूबाई बापू इटनर (वय 35) यांनी खोल पाण्यात उडी मारली आणि आपल्या मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न करीत असताना तिचा पण खोल पाण्यातून बाहेर पडता येत नसल्याने इंदुबाईने आरडाओरडा केला असतानांच जवळच असलेल्या भाऊ अंबादास केरूबा खरात( वय 29) यांनी खोल पाण्यात उडी घेऊन दोघांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र खोल पाण्यातून बाहेर पडता आले नाही. त्यामुळे तिघे पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला.

Web Title: Nashik Five people drowned in water

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here