Home नागपूर धक्कादायक! नराधम बापाने सख्ख्या मुलीचे पाच वर्ष लैंगिक शोषण

धक्कादायक! नराधम बापाने सख्ख्या मुलीचे पाच वर्ष लैंगिक शोषण

Breaking News | Nagpur Crime: नराधम बापाने सख्ख्या मुलीचे सलग पाच वर्षांपासून लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Naradham Bapane Sakkhya Muliche sexual exploitation

नागपूर : नराधम बापाने सख्ख्या मुलीचे सलग पाच वर्षांपासून लैंगिक शोषण केले. बापाच्या त्रासाला कंटाळून मुलीने घरातून पळ काढला. मुलगी अचानक बेपत्ता झाल्यामुळे बापाने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी शोध घेतला असता मोठा खळबळजनक उलगडा मुलीने केला. या प्रकरणी पोलिसांनी बापाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी हा शेतमजूर आहे. तो कामाच्या शोधात नागपुरात आला होता. पत्नी व दोन मुलींसह एका शेतकऱ्याकडे कामाला लागला. आरोपीला दारुचे व्यसन होते. तो विकृत मानसिकतेचा होता. त्याची पत्नी त्याच्या लैंगिक अत्याचाराला कंटाळली होती. त्यामुळे तिने मोठ्या मुलीला पतीकडे सोडून लहान मुलीसह माहेर गाठले. दुसऱ्या व्यक्तीशी संसार थाटला. दुसरीकडे आरोपीने महिन्याभरात एका विधवा महिलेशी लग्न केले. मात्र, विकृत मानसिकता असल्यामुळे त्याची नजर स्वतःच्या मुलीवर पडली. १४ वर्षांची असतानाच नराधम बाप तिच्यावर लैंगिक अत्याचार करायला लागला. सावत्र आई असल्यामुळे तिला सांगूनही काही उपयोग नव्हता. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून मुलगी वडिलांकडून होणारा लैंगिक अत्याचार सहन करीत होती.

गेल्या वर्षभरापूर्वी मुलगी वडिलांकडून गर्भवती राहिली. वडिलाने लगेच तिला खासगी औषध आणि गोळ्या देऊन तिचा गर्भपात करवून घेतला. मुलगी २० दिवस आजारी पडली. प्रकृती बघून वडिलांना दया येईल, असे वाटत असतानाच आरोपीने पुन्हा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणे सुरु केले.

मुलीने बारावीत प्रवेश घेतला होता. तिने वडिलांना नवीन कपडे आणि पुस्तके विकत घेऊन मागितले होते. मात्र, आरोपीने तिला पुस्तकासाठी पैसे दिले नाही. बापाच्या नेहमीच्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या मुलीने घरातून पळ काढला. ती थेट मावशीकडे गेली. मावशीला तिने आपबिती सांगितली.

मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविल्यानंतर ठाणेदार ज्ञानेश्वर भेदोडकर यांनी मुलीशी संपर्क केला. मुलगी दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात पोहचली. तिने पोलिसांना बापाच्या लैंगिक अत्याचाराबाबत माहिती दिली. पोलिसांनी आरोपी बापाला अटक करण्यात आली आहे.

Breaking News: Naradham Bapane Sakkhya Muliche sexual exploitation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here