नगर अर्बन बँक: चिल्लर घोटाळ्यातील चार जण अटकेत
अहमदनगर: नगर अर्बन बँकेतील अडीच कोटी चिल्लर अपहरण प्रकरणी शुक्रवारी अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने चार जणांना अटक केली आहे. तसेच इतर आरोपींवर लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे समजते.
यामध्ये अर्बन बँकेचा तत्कालीन मुख्य शाखाधिकारी घनश्याम अच्चुत बल्लाळ, मार्केट यार्ड शाखेचा तत्कालीन शाखाधिकारी प्रदीप जगन्नाथ पाटील, शाखेतील तत्कालीन काशियार राजेंद्र विलास हुंडेकरी व तत्कालीन पासिंग अफिसर स्वप्नील पोपटालाल बोरा या जणांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी त्यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सांगितले.
याप्रकरणी बँकेचे मुख्य शाखाधिकारी मारुती रंगनाथ औटी यांनी २२ डिसेंबर २०२० रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तीन कोटी रुपयांचा अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
आरोपी आशुतोष लांडगे हा अर्बन बँकेचा कर्जदार आहे. त्याचे बँकेत खाते आहे. या खात्यावर ऑक्टोबर २०१७ रोजी अडीच कोटी रुपयांचा भरणा केल्याचे दर्शविण्यात आले मात्र हा भरणा केला गेला नाही. केवळ आभासी भरणा दाखविण्यात आला. त्यानंतर पुन्हा लांडगे यांच्या संस्थेला कर्ज देण्यात आले. बँकेचे सभासद राजेंद्र गांधी यांनी हा अपहार बाहेर आणल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.
Web Title: Nagar Urban Bank Four arrested in chiller scam