धक्कादायक: महिलेचे हातपाय बांधून मंगळसुत्रासाठी ९ महिन्याच्या चिमुकल्याचा खून
बार्शी | Barshi: दागिने चोरण्यासाठी भरदिवसा घरात घुसून महिलेचे हातपायबांधून आणि ९ महिन्याच्या बाळाचा खून केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार पथके रवाना केली आहेत. अद्याप कोणास अटक झालेली नाही.
शनिवारी दुपारी ही घटना घडली. मयत लहान बाळाचे चुलते आनंद राजेंद्र तुपे यांनी तालुका पोलिसांत तक्रार करत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
सार्थक स्वानंद तुपे वय ९ महिने या बालकाचा मृत्यू झाला आहे. त्याची आई अश्विनी तुपे जखमी झाली आहे. हे तुपे कुटुंबीय वांगरवाडी जिल्हा परिषद शाळेजवळ राहतात. अश्विनी हिचा पती ट्रकचालक असून ते बाहेरगावी गेले होते. सासू सासरे शेतात गेले होते. दीर बार्शी येथे कामानिमित्त गेले होते. मोठा मुलगा बाहेर खेळण्यास गेला होता. अश्विनी आणि सार्थक घरात एकटेच होते.
अश्विनी तुपे बाळाला पाळण्यात झोपवून पीठ चाळत होती. मुलाचा रडण्याचा आवाज आला तर एक चोरटा चार्जरच्या वायरीने सार्थकाचा गळा आवळत होता. त्यावेळी अश्विनीने त्यास अडविले तुला जे पाहिजे ते घेऊन जा पण माझ्या मुलास मारू नको असे म्हणताच तिला ढकलून दिले. लहान सार्थकचा गळा आवळून मारून जमिनीवर टाकले. अश्विनीचे हात पाय बांधून तोंडात बोळा कोंबला व त्या चोरट्याने कपाटातील १२ हजाराचे दागिने, गळ्यातील मणी मंगळसूत्र गळ्यातील ओरबांडून चोरट्याने मक्याच्या शेतातून पळ काढला.
Web Title: Murder of 9-month-old for Mangalsutra by tying woman’s limbs