Home नांदेड अनैतिक संबंधातून खून, अर्धवट जळालेला मृतदेह आढळला

अनैतिक संबंधातून खून, अर्धवट जळालेला मृतदेह आढळला

Breaking News | Nanded Crime:  अर्धवट जळलेला व्यक्तीचा मृतदेह आढळला.

Murder due to immoral relationship, partially burnt body found

नांदेड | मांडवी:  किनवट तालुक्यातील पिंपळगाव जंगलात शनिवारी (ता. सात) अर्धवट जळलेला व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून अनैतिक संबंधातून खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मांडवी पोलिसांनी दोन संशियीत आरोपींना अटक केली आहे.

अधिक माहिती अशी, की पिंपळगाव जंगलातील राजोबा देवापासून एक किलोमीटर अंतरावर एका व्यक्तीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने मांडवी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन या घटनेची पोलिस ठाण्यात नोंद केली. पोलिसांनी तपासचक्र गतीने फिरवत त्या मृत व्यक्तीची ओळख पटवली. नारायण जानकोंडा (वय ५०, रा. पिंपळकोंटी, ता. भिमपुर) असे मृताचे नाव आहे.

मृत नारायण जाणकोंडा यांच्या पत्नीसोबत विनोद नरसिंग मारशेटी (वय ४७, रा. पिंपळकोटी) याचे अनैतिक संबंध होते. यात अडथळा येऊ नये म्हणून, संशयीत आरोपी विनोद व देवन्ना शिवन्ना बोनगिरी (वय ४८) या दोघांनी पाच सप्टेंबर रोजी नारायण जानकोंडा याला किराणा सामान घेऊन देतो, असा बहाना करून पिंपळगाव फाटामार्गे पिंपळगाव जंगलात आणले. तेथे त्याच्यावर पेट्रोल टाकून जाळले आणि पोबारा केला.

याप्रकरणी फिर्यादी संतोष किष्टन्ना जानकोंडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला होता. संशयित आरोपी विनोद नर्सिंग मारशेटी, देवन्ना शिवन्ना बोनगिरी यांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई मांडवी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गफुर शेख, पोलिस उपनिरीक्षक मस्के, श्याम चव्हाण, हेमंद कांबळे, मनीष ठाकरे, शिवाजी अन्नमवार यांनी केली.

Web Title: Murder due to immoral relationship, partially burnt body found

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here