Home अहमदनगर चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून करून अंगणात पुरणाऱ्या पतीस जन्मठेप

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून करून अंगणात पुरणाऱ्या पतीस जन्मठेप

Murder Case Life imprisonment for a man who murdered his wife

अहमदनगर | Murder Case: चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा खून करून तिचा मृतदेह घरासमोरच पुरणाऱ्या रमेश शिवाजी जाधव याला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार रुपयांची दंडाची शिक्षा सुनावली.

जिल्हा सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी या खटल्याचा निकाल गुरुवारी दिला. यामध्ये सात साक्षीदार तपासण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, रमेश जाधव व हिराबाई यांना दोन मुले व तीन मुली आहेत. रमेश हिराबाईच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिला नेहमी मारहाण करीत असे. त्यामुळे त्यांची दोन मुलेही त्यांच्याजवळ राहत नसत दिनांक २१ फेब्रुवारीच्या सकाळी रमेश जाधव याने चारित्र्याचा संशय घेऊन हिराबाईला लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यात तिचा मृत्यू झाला. हिराबाईचा मृतदेह घरासमोरच खड्डा खोदून पुरला. ही माहिती सरपंच यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी पाथर्डी पोलीस ठाण्यात दूरध्वनीने कळविले. त्यानुसार पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचानामा केला व रमेश जाधव याला ताब्यात घेतले.

हिराबाईचा भाऊ संतोष वाघ याने पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस उप निरीक्षक पावसे यांनी केला.  

Web Title: Murder Case Life imprisonment for a man who murdered his wife

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here