संगमनेर: बिबट्याने नव्हे तर मित्रानेच केला मित्राचा घात, मैत्रिणीला रिक्वेस्ट पाठविली अन…
Sangamner Crime News: बिबट्याच्या हल्ल्यात या तरुणाचा मृत्यू झाला असावा असा तर्क अखेर खोटा, एका गावाचे दोन मित्रांमध्ये वाद, गळ्यावर कोयत्याने वार करून हत्या (Murder).
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पठार भागातील धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागात असलेल्या कुरकुटवाडी येथे २७ ऑक्टोंबरच्या मध्यरात्री तरुणाच्या झालेल्या मृत्यूची खरे कारण उघडकीस आले आहे. सुरुवातीला बिबट्याच्या हल्ल्यात या तरुणाचा मृत्यू झाला असावा असा तर्क होता मात्र अखेर तो खोटा ठरला आहे. पोलीस तपासात मित्रानेच त्याच्या मैत्रिणीला पाठविलेल्या समाज माध्यमातील फ्रेंड रिक्वेस्टच्या कारणावरून मित्रानेच त्याचा खून केल्याचे समोर आले आहे.
सचिन भानुदास कुरकुटे (वय २२ वर्ष, रा. कुरकुटवाडी, ता. संगमनेर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून गणेश बबन कुरकुटे (वय २१ वर्ष, रा. कुरकुटवाडी, ता. संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याने या खुनाची कबुली दिली असल्याचे संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी म्हटले आहे.
२७ ऑक्टोंबरला मध्यरात्री साडेबारा वाजले च्या सुमारास कुरकुटवाडी गावामध्ये घराच्या ओट्यावर झोपलेल्या सचिन भानुदास कुरकुटे याच्या मानेवर खोल झालेल्या जखमेमुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी तातडीने आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यु झाला होता.
त्यामुळे गोकुळ जिजाबा कुरकुटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आळेफाटा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर या संबंधीची कागदपत्रे घारगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे या मृत्यू प्रकरणाचा तपास करत होते. दरम्यान रात्रीची वेळ असल्याने मृत सचिन याच्यावर बिबट्याने हल्ला केला व त्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला असावा, असा तर्क काढला गेला होता तसेच या अनुषंगाने सर्वत्र चर्चा देखील सुरू होती..
आळे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालामध्ये सचिन कुरकुटे यांच्या मानेवरील जखम हत्याराने झाली असल्याचा निष्कर्ष काढला असल्याने तपास अधिकाऱ्यांनी सचिन कुरकुटे याचा खून झाला असावा’ या अंदाजाने पुढील तपास सुरू केला होता.
मृत सचिन कुरकुटे याचे आर्थिक व्यवहार तसेच घरगुती व बाहेरील लोकांसोबत असलेले वाद, प्रेम संबंध यासह अन्य शक्यता लक्षात घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. तपासा दरम्यान पोलिसांनी जवळपास डझनभर लोकांचे जबाब नोंदविले तसेच मृत सचिन कुरकुटे यांच्या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणाचा अभ्यास केल्यानंतर त्याने एका मैत्रिणीस समाज माध्यमातून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली असल्याचे लक्षात आले.
मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली, या कारणामुळे सचिन कुरकुटे व गणेश कुरकुटे यांच्यात वाददेखील झाले होते ही बाब समोर आली. त्यानंतर केलेल्या तपासात गणेश कुरकुटे यांनी या रागातून सचिन कुरकुटे याची झोपेत असताना गळ्यावर कोयत्याने वार करून हत्या केली असल्याचे समोर आले. त्यामुळे आरोपी गणेश कुरकुटे आला पोलिसांनी अटक केली असून त्याने खून केल्याची कबुली दिली. आरोपीस न्यायालयात हजर केले जाणार आहे.
पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे, सहाय्यक फौजदार एसे. डी. टकले, पोलीस कॉन्स्टेबल पी. एस. चव्हाण, प्रमोद गाडेकर, एन. एम. बिरे, एस. एस. धनाड, सायबर सेलचे ए. ए. बहिरट यांनी या गुन्हयाची उकल केली.
Web Title: Murder Case friend attacked a friend, not a leopard, sent a request to a friend
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App