Murder Case: बापानेच ९ महिन्याच्या चिमुकल्यावर घातला कुऱ्हाडीचा घाव
Murder Case | रायपुर: छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यात एका बापाने आपल्या नऊ महिन्याच्या मुलावर कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांस अटक केली आहे. हे प्रकरण कपू पोलीस स्टेशन करमाई गावचे आहे. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, धनुराम मांझी याचे आपल्या पत्नीबरोबर खाण्यावरून वाद झाला होता. तो आपल्या पत्नीकडे जेवण मागत होता, त्यावर पत्नीने काही वेळ थांबण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाले. वाद विकोपाला गेले रागाच्या भरात धनुरामने पत्नीला मारण्यासाठी कुऱ्हाड हातात उचलली. तिला मारण्यासाठी तिच्या मागे धावत गेला. पत्नी आपला जीव वाचवून कशी तरी पळून गेली. त्यावेळी घरात झोपलेल्या ९ महिन्याच्या मुलावर कुऱ्हाडीने घाव घातला. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक करून तुरुंगात पाठविण्यात आले.
Web Title: Murder Case father himself inflicted the ax wound on the chimpanzee