Home कोल्हापूर धक्कादायक! दोनशे रुपयांसाठी युवकाची हत्या

धक्कादायक! दोनशे रुपयांसाठी युवकाची हत्या

Kolhapur Crime News: केवळ दोनशे रुपयांच्या वसुलीसाठी सिमेंटच्या पाईपच्या तुकडा डोक्यात घालून आणि धारदार शस्त्राने वार करून एकाची हत्या.

Murder a youth for two hundred rupees

कोल्हापूर:  कोल्हापुरातील उचगाव परिसरात गुरुवारी केवळ दोनशे रुपयांच्या वसुलीसाठी सिमेंटच्या पाईपच्या तुकडा डोक्यात घालून आणि धारदार शस्त्राने वार करून एकाची हत्या केल्याची रात्री उशिरा पोलीस तपासात उघड झालेलं आहे.

गुरुवारी उचगाव परिसरात गणेश नामदेव संकपाळ यांची हत्या झाली. गणेश हे बुधवारी रात्री डॉक्टरांकडे जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडले हाेते. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना गणेश संकपाळचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं निदर्शनास आल्यानं ही घटना उघड झाली होती.

कोल्हापूर पोलिसांनी त्वरित तपासाची चक्र फिरवून संशय त्यांना रात्री ताब्यात घेतलं. संशयित आरोपी आणि गणेश संकपाळ याच्यात किरकोळ वादावादी झाल्यानंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झालं केवळ दोनशे रुपयांच्या वसुलीवरून हा वाद झाला आणि यातूनच गणेश संकपाळची हत्या झाल्याची कबुली संशयित आणि पोलिसांकडे दिलेली आहे.

Web Title: Murder a youth for two hundred rupees

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here