अहमदनगरमध्ये म्युकरमायकोसिसचे प्रमाण वाढले सध्या १८ रुग्ण
अहमदनगर | Mucomycosis in Ahmednagar : कोरोनाचे संकट सुरु असतानाचा नगर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत आहे. म्युकरमायकोसिसचे १८ रुग्ण नगर शहरात वेगवेगळ्या शहरात उपचार घेत आहेत. अशी माहिती डॉक्टररानीच दिली आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची देखील चिंता वाढली आहे.
गुरुवारी महापालिकेच्या सभागृहात शहरातील खासगी कोविड रुग्णालयांच्या डॉक्टरांची बैठक पार पडली. यावेळी डॉक्टरांनी म्युकरमायकोसिसचे वाढते प्रमाणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. हा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना हा आजार होतो. याअगोदर श्रीरामपूर, श्रीगोंदा तालुक्यांत रुग्ण आढळून आलेले आहेत.
कोरोनात प्रतिकारशक्ती घटल्यामुळे अनेक रुग्णांना म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार होत आहे. हा आजारही जीवघेणा आहे. या आजारात डोळे, कान, मेंदू, यात संसर्ग होत आहे. वेगाने हा संसर्ग पसरतो. त्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करावी लागत आहे. या आजारात काहीना डोळे गमवावे लागत आहेत तर काहींचा जबडा काढावा लागत आहे. म्युकरमायकोसिसचे रुग्णांना काही इंजेक्शन द्यावे लागतात. मात्र ही इंजेक्शन नगर शहरात उपलब्ध नाही. त्यामुळे डॉक्टरांची अडचण होत आहे.
Web Title: Mucomycosis increased in Ahmednagar