Home अहमदनगर महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास दोघा भावांनी केली मारहाण

महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास दोघा भावांनी केली मारहाण

MSEDCL junior engineer beaten by two brothers

Ahmedagar Crime | अहमदनगर: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांना दोघा सख्या भावांनी कार्यालयात घुसून मारहाण (Beaten) केल्याची घटना नगर तालुक्यातील अकोळनेर सबस्टेशन येथे शुक्रवारी सायंकाळी ही घडली.

या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दोघा भावांविरूध्द सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कनिष्ठ अभियंता संदीप विठ्ठल बराट (वय 40 रा. देहेरे ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

विकास सुरेश भोर व विजय सुरेश भोर (दोघे रा. अकोळनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, वीजेच्या तारा तुटल्यामुळे अकोळनेर शिवारातील गणेश बेरड यांच्या मालकीचा गहू जळाला होता. तेथे वीज वितरणच्या अधिकार्‍यांनी भेट देवुन तारा ऐवजी केबल टाकण्यास सांगितले होते.

बेरड यांच्या शेजारी असलेले भोर यांनी त्याला विरोध केला. त्यांनी शुक्रवारी सायंकाळी अकोळनेर सबस्टेशन येथे जावुन अभियंता बराट यांना जाब विचारला. बराट यांना शिवीगाळ, दमदाटी करून शर्टची कॉलर पकडुन मारहाण केली. कार्यालयाच्या बाहेर ओढून शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वा. ऐ. चव्हाण करीत आहेत.

Web Title: MSEDCL junior engineer beaten by two brothers

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here