संगमनेर: मोटारसायकल चोरणारी टोळी जेरबंद, ५१ मोटारसायकली हस्तगत
Sangamner News: बारा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत धुमाकूळ घालणार्या मोटारसायकल चोरांच्या तीन जणांच्या टोळीला जेरबंद (Arrested) करण्यात संगमनेर शहर पोलिसांना यश.
संगमनेर: पाच जिल्ह्यांतील बारा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत धुमाकूळ घालणार्या मोटारसायकल चोरांच्या तीन जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात संगमनेर शहर पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून 20 लाख रुपये किमतीच्या ५१ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या घटना रोखण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारे मोटार सायकल चोरी झाली होती. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी शहरातून चोरीला गेलेल्या मोटरसायकल चोरीचा तपास सुरू केला. यासाठी सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज तपासण्यात आले. या फुटेजचे विश्लेषण करून पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. त्याने अन्य दोघांची नावे सांगितल्यानंतर पोलिसांनी पसार झालेल्या त्या दोघानाही अटक केली.
या आरोपींनी नाशिक, पुणे, वाशिम आणि छत्रपती संभाजीनगरसह मध्य प्रदेशमधील सैंधवा येथूनही वेगवेगळ्या दुचाकी चोरल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या प्रकरणात संगमनेर पोलिसांनी अक्षय सावन तामचीकर, सूरजीत दिलीपसिंग तामचीकर (दोघेही भाटनगर, घुलेवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी गेल्या आठ दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी छापा मारून आत्तापर्यंत 51 मोटारसायकली जप्त केल्या.
सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 22, ओझर व सायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी दोन, इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन सातपूर औद्योगिक वसाहतीतून एक, पुणे जिल्ह्यातील मंचर आणि चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील मालेगावमधून दोन आणि चक्क मध्य प्रदेशातील सेंधवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनही त्यांनी एक मोटारसायकल मोटर सायकलची चोरी केली होती.
तपासी पथकातील प्रभारी उपअधीक्षक संजय सातव, शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पोलीस उपअधीक्षकाच्या पथकातील पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे, अमृत आढाव, प्रमोद गाडेकर व अप्पर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयातील सायबर सेलचे पोलीस नाईक फुरकान शेख व पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद जाधव यांनी ही कामगिरी बजावली पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या पथकाचे कौतुक केले आहे.
Web Title: Motorcycle theft gang Arrested
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App