सून-मामीनं मिळून २० दिवसांत अख्खं कुटुंब संपवलं; पाच जणांची हत्या, थरारक घटना
Murder Case: सुनेनं आणि मामीने रचला हत्येचा कट, धक्कादायक कारण समोर आले आहे.
गडचिरोली: अहेरी तालुक्यातील माहागाव या गावी एकाच कुटुंबातील लागोपाठ पाच जणांच्या हत्याच्या घटनेचं गुढ उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. सून आणि मामीला पाच जणांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सासरच्या छळाला कंटाळून सुनेने तर संपत्तीच्या वादातून मामीने मिळून हा कट रचल्याचं समोर आलं आहे. या दोघींनी अन्न आणि पाण्यातून विष देत थंड डोक्यानी हे हत्याकांड केल्याचे समोर आले आहे.
सून संघमित्रा रोशन कुंभारे (२५) व रोशनची मामी रोजा रामटेके (५२) या दोघींना पोलिसांनी अटक केली आहे.
शंकर तिरुजी कुंभारे (५२), विजय शंकर कुंभारे, त्यांची विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर (२९, रा. गडअहेरी ता. अहेरी), मावशी आनंदा उराडे (५०, रा. बेझगाव ता. मूल जि. चंद्रपूर), मुलगा रोशन शंकर कुंभारे (२८) अशी मृत व्यक्तींचे नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, २२ सप्टेंबरला रात्री जेवण केल्यावर विजया शंकर कुंभारे यांची तब्येत बिघडली. डोकेदुखी व उलट्या होऊ लागल्याने पती शंकर तिरूजी कुंभारे यांनी त्यांना चंद्रपूरला नेले. त्यानंतर शंकर यांचीही प्रकृती खालावली. दोघांनाही उपचारादरम्यान नागपूरला हलविले. उपचार सुरु असताना २६ रोजी शंकर तर २७ रोजी विजया यांची प्राणज्योत मालवली. ही घटना घडली तेव्हा विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर (२९,रा.गडअहेरी ता.अहेरी) माहेरी होती. प्रकृती खालावल्याने चंद्रपूरला नेताना ८ ऑक्टोबरला वाटेत तिने प्राण सोडले. शंकर कुंभारे यांचा मोठा मुलगा रोशन कुंभारे (२८) याचा १५ ऑक्टोबरला सकाळी आठ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याची मावशी आनंदा उंदीरवाडे (५०, रा. बेझगाव ता. मूल जि.चंद्रपूर) ही अंत्यविधीसाठी महागावला आली होती. चंद्रपूर येथे खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान १४ ऑक्टोबरला मध्यरात्री तिची प्राणज्योत मालवली. तर रोशनच्या आई-वडिलांना दवाखान्यात नेणारा खासगी वाहनचालक राकेश अनिल मडावी ( रा.महागाव ) याच्यावर नागपूर, रोशनचा मावसभाऊ बंटी उंदीरवाडे (रा.बेझगाव ता.मूल जि.चंद्रपूर) याच्यावर चंद्रपूर व रोशनचा भाऊ राहुल हा दिल्लीत उपचार घेत आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
लागोपाठ होणाऱ्या मृत्यूसत्रानंतर अहेरी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. उपअधीक्षक डॉ. सुदर्शन राठोड आणि पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यांनी तपास सुरु केला. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी १८ ऑक्टोबरला पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. अपर अधीक्षक यतीश देशमुख, कुमार चिंता, अनुज तारे, उपअधीक्षक डॉ. सुदर्शन राठोड उपस्थित होते. या थरारक घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
Web Title: mother-in-law together killed the entire family in 20 days Murder of five people
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App