Home अहिल्यानगर शिर्डी येथे विमानात एअर होस्टेसचा विनयभंग

शिर्डी येथे विमानात एअर होस्टेसचा विनयभंग

Breaking News | Ahilyanagar: मद्यधुंद प्रवासी लष्करी जवानावर गुन्हा दाखल.

Molested Vinayabhang of air hostess at Shirdi

शिर्डी : दिल्लीहून शिर्डीला येणाऱ्या विमानात एका मद्यधुंद प्रवाशाने एअर होस्टेसचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक ६ई ६४०३ मध्ये घडली

. विमान शिर्डीत उतरल्यानंतर एअरलाइन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राहाता पोलिसांनी आरोपी प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल केला. हा प्रवासी लष्करी जवान असल्याचे पोलिस तपासात समोर आले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पीडित एअर होस्टेस मूळची केरळमधील कोचीन येथील आहे. शुक्रवारी (दि. २) दुपारी दिल्ली ते शिर्डी या विमानाच्या प्रवासादरम्यान ही घटना घडली. आरोपी प्रवासी संदीप सुमेर सिंग याने एअर होस्टेसला लज्जा उत्पन्न होईल असे दोन वेळा वर्तन केले, असे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेनंतर शिर्डी विमानतळ इंटरग्लोब एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड इंडिगो कंपनीचे कर्मचारी संतोष कोंडिबा चौरे (वयः ४६, रा. लोणी) यांनी राहाता पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार, पीडित एअर होस्टेसने याबाबत लेखी तक्रार दिली असून, आरोपी संदीप सुमेर सिंग (रा. राजस्थान) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Breaking News: Molested Vinayabhang of air hostess at Shirdi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here