Home अहिल्यानगर सरकारला दारू आवडते, महाविकास आघाडीच्या सरकारच्या पुतळ्याला दारूचा अभिषेक

सरकारला दारू आवडते, महाविकास आघाडीच्या सरकारच्या पुतळ्याला दारूचा अभिषेक

MNS Alcohol anointing to Mahavikas Aghadi government

अहमदनगर | MNS: मनसेच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त केला आजे. महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला दारूचा अभिषेक जिल्हा सचिव नितीन भूतारे, उप शहर अध्यक्ष गणेश शिंदे, संकेत व्यवहारे आदींसह कार्यकर्त्यांनी अभिषेक घालून निषेध व्यक्त केला.

सरकारला दारू प्यारी आहे असे आरोप करत महाविकास आघाडीच्या पुतळ्याला दारूचा अभिषेक घालण्यात आला.

कोरोना काळात सरकारने लॉकडाऊन जाहीर केलेले असताना सर्व व्यवहार ठप्प करण्यात आले आहे. बाजरपेठ, दुकाने बंद आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाने लोकांकडे दारू प्यायला पैसे राहिले नाहीत. दारू घ्यायची म्हंटले तरी व्याजाने पैसे घ्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत सरकारने फक्त दारू विक्री चालू ठेवण्याचे आदेश दिले आहे, कपड्याचे दुकान, किराणा, मोबाईल दुकान या क्षेत्रात काम करणारे कामगार आज त्यांना दोन तीन महिने झाले पगार नाही, शासनाची कोणतीही मदत नाही. सरकारने दारू विक्री पार्सल सुविधा सुरु केली आहे. दारू खुले आम विक्री करायची आणि किराणा माल चोरून विकायची अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

सरकारने सर्वसामान्य लोकांचा विचार करून योग्य नियोजन करून बाजारपेठ लवकरात लवकर चालू करण्याचे आदेश द्यावेत मनसेने सरकारचा जाहीर निषेध केला आहे. येणाऱ्या काळात मनसे मोठ्या प्रमाणात रस्ता रोको आंदोलन करेल असा इशारा मनसेचे नितीन भूतारे यांनी दिला आहे.  

Web Title: MNS Alcohol anointing to Mahavikas Aghadi government

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here