Home अकोले अजित दादा गटातील आमदार लहामटे थेट महायुती सरकारच्या विरोधात

अजित दादा गटातील आमदार लहामटे थेट महायुती सरकारच्या विरोधात

Ahmednagar News : ऐन निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनाचे हत्यार उपसलं.

MLAs from Ajit Dada faction are directly against the grand coalition government

अकोले: महाराष्ट्रात सध्या मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतय. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी एक मोठे जन आंदोलन सुरू करण्यात आले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणावरून राज्यात वाद सुरू आहेत. दुसरीकडे आता राज्यातील धनगर समाजाने देखील आरक्षणासाठी सरकारवर दबाव बनवण्यास सुरुवात केली आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनाचे हत्यार उपसलं आहे. खरे तर दहा वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षणाचा आश्वासन दिलं होतं. मात्र एक दशक उलटल्यानंतरही आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणताच अंतिम निर्णय झाला नसल्याने धनगर समाजाने आता आंदोलनाचा निर्धार केला आहे.

यासाठी उद्यापासून आंदोलन सुरू होणार आहे. मात्र धनगर समाजाच्या आरक्षणावरून आता महायुती मधूनच विरोध सुरू झाला आहे. महायुतीमध्ये समाविष्ट असणारे अजित दादा यांच्या गटातील आमदार किरण लहामटे यांनी जर धनगर समाजाला शेड्युल ट्राईब म्हणजेच एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळाले तर आंदोलन करू असा इशारा दिला आहे. यामुळे महायुतीमध्ये अजितदादांची कोंडी होणार असे भासत आहे.

अकोले विधानसभेचे आमदार लहामटे यांच्या या भूमिकेमुळे अजित दादा आणि भाजपा आमने-सामने येणार का? अशाही चर्चा आता सुरु झाल्या आहेत. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला महायुती सरकारने धक्का लावू नये अशी मागणी लहामटे यांनी लावून धरली आहे तसेच समाजाच्या हितासाठी लढाई लढण्याची आपली तयारी असल्याचेही स्पष्ट केले आहे.

मराठा आणि धनगर समाज आंदोलनावर ठाम

एकीकडे राज्यात मराठा आरक्षणावरून मोठा वाद सुरू आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आज मध्य रात्रीपासून बेमुदत उपोषणावर बसणार अशी बातमी समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे सरकार ऍक्शन मोडवर आले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शिंदे सरकार विशेष अधिवेशन बोलावणार असे संकेत सरकारमधील मंत्र्यांनी दिले आहेत.

त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेल असे वाटत आहे. पण, दुसरीकडे धनगर समाजाने उद्यापासून सात दिवस आंदोलन केल्यानंतर थेट जलसमाधीचा इशारा दिला आहे. दरम्यान, धनगर समाजाला जर अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळाले तर आदिवासी समाज आंदोलन पुकारणार अशी भूमिका अजितदादा गटातील आमदार लहामटे यांनी जाहीर केली आहे.

यामुळे महायुती सरकारसाठी विविध समाजाचा आरक्षणाचा मुद्दा डोकेदुखी ठरणार आहे. विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत आणि अशातच विविध समाजाचा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यामुळे शिंदे सरकार या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेते हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे.

लहामटे यांची भूमिका काय?

लहामटे यांनी धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय ज्यांनी कोणी घेतला आहे त्याचा निषेध केला आहे. संविधानाने आदिवासी समाजाला आरक्षण मिळालेले आहे. हे घटनात्मक आरक्षण असून यामध्ये 47 जमाती समाविष्ट आहेत. आता नव्याने यामध्ये कोणाचाही समावेश होऊ शकत नाही यामुळे कोणीही संविधानाची पायमल्ली करू नका असा इशारा लहामटे यांनी दिलाय.

जर धनगर समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर स्वातंत्र आरक्षण द्या, आमचा याला विरोध राहणार नाही, पण एसटी कॅटेगिरी मधून आरक्षण देऊन आदिवासींना कायदा हातात घ्यायला लावू नका असा इशारा दिला आहे. आमदार महोदयांच्या या भूमिकेमुळे महायुतीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलाचं वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या भूमिकेमुळे अजित दादा यांची महायुतीमध्ये कोंडी होणार आणि अजित दादा आणि भाजपा आमने-सामने येणार अशा चर्चा आहेत. तथापि या संदर्भात महायुती सरकार नेमकी काय भूमिका घेते ही गोष्ट पाहणे नक्कीच उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: MLAs from Ajit Dada faction are directly against the grand coalition government

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here