आमदार डॉ. किरण लहामटे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर
अकोले: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे यांना मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आमदार हे संगमनेर येथील चैतन्य हॉस्पिटलात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉ. नितीन जठार हे त्यांच्यावर उपचार करत होते. मात्र बुधवारी सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उप मुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री यांच्याकडून त्यांची तब्येतीची विचारपूस झाली. डॉ. लहामटे यांची प्रकृती स्थिर असली तरी अद्याप ताप कायम असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उप मुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री यांच्या आग्रहाखातर डॉ. लहामटेवर पुढील उपचार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी त्यांना मुंबई येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान आमदार लहामटे १६ मे रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले, ते राजूर येथे निवास्थानी विलगीकरण राहून ३ दिवस घरीच उपचार घेत होते. ताप काही कमी होत नसल्याने संगमनेर येथे चैतन्य हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मुंबई येथे नेण्यात आले मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
Web Title: MLA Dr. Kiran Lahamate admitted to Breach Candy Hospital