Home जळगाव अल्पवयीन मुलीचा गळा आवळून बेशुद्ध केले मग अतिप्रसंग

अल्पवयीन मुलीचा गळा आवळून बेशुद्ध केले मग अतिप्रसंग

Crime News: अल्पवयीन मुलीने अतिप्रसंगास विरोध केल्याने तिच्या डोक्यात दगड मारून तिचा गळा आवळला. ती बेशुद्ध झाल्यावर तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा प्रकार.

minor girl was choked and rendered unconscious after the incident

पारोळा | जळगाव : अल्पवयीन मुलीने अतिप्रसंगास विरोध केल्याने तिच्या डोक्यात दगड मारून तिचा गळा आवळला. ती बेशुद्ध झाल्यावर तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला. ही अमानुष घटना गुरुवारी सायंकाळी घडली. यात एकासअटक करण्यात आली आहे.

बारक्या ऊर्फ अशोक मंगा मोरे (२०) असे या अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे. पीडित १४ वर्षीय बालिका गुरुवारी सायंकाळी गावानजीक नदीकाठी गेली होती. त्यावेळी बारक्या याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यास बालिकेने विरोध करताच त्याने तिच्या डोक्यात दगड मारला आणि जवळच असलेल्या दोरीने तिचा गळा आवळला, त्यामुळे ती बेशुद्ध झाली. काही वेळाने शुद्धीवर आल्यावर अतिप्रसंग झाल्याचे तिच्या लक्षात आले. ही घटना तिने घरी सांगितली. तिला पारोळा कुटीर रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नंतर धुळे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

Web Title: minor girl was choked and rendered unconscious after the incident

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here