Home महाराष्ट्र मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी प्रसूत, धक्कादायक घटना.

मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी प्रसूत, धक्कादायक घटना.

Breaking News | Satara Crime: मावस भावाच्या अत्याचारातून (abused) बहीण प्रसूत.

minor girl was born due to the abuse of her maternal uncle

साताराः वाई तालुक्यातील एका गावात बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली. मावस भावाच्या अत्याचारातून बहीण प्रसूत झाली. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात संबंधित मावस भावावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही नात्याने मावस बहीण-भाऊ, तिचे वय १६ तर त्याचे वय २९. बहीण अल्पवयीन आहे, हे माहीत असूनही भावाने तिच्यावर त्याच्या व तिच्या घरात कोणी नसताना वारंवार अत्याचार केला. हा प्रकार मे २०२३ ते २०२४ या कालावधीत घडला. मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी मुलगी गरोदर असल्याचे समोर आले. एवढेच नव्हे तर काही महिन्यांनंतर मुलीची प्रसूतीही झाली. तिने मुलाला जन्म दिला. या प्रकारानंतर पीडित मुलीने १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने भुईंज पोलिसांनी संबंधित मावस भावाला तातडीने अटक केली. पोलिस उपनिरीक्षक पतंग पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: minor girl was born due to the abuse of her maternal uncle

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here