अहिल्यानगर: अल्पवयीन मुलीला फोटो व्हायरल करण्याची धमकी
Breaking News | Ahilyanagar: अल्पवयीन मुलीस लज्जा उत्पन्न होईल, असे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून तिला शहरातील एका हॉटेलमध्ये घेवून जावून तिचा विनयभंग करणार्या एका तरुणाविरुध्द शहर पोलीस ठाण्यात पोस्को तसेच अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा.
श्रीरामपूर: अल्पवयीन मुलीस लज्जा उत्पन्न होईल, असे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून तिला शहरातील एका हॉटेलमध्ये घेवून जावून तिचा विनयभंग करणार्या एका तरुणाविरुध्द शहर पोलीस ठाण्यात पोस्को तसेच अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सदर मुलीच्या आईने शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, दि. 11 एप्रिल रोजी सायंकाळी मी कामावर असताना मला एकाने तुमच्या मुलीला एक मुलगा वॉर्ड नं.7 मधील हॉटेल विजय येथे घेवुन बसलेला असल्याचे सांगितले. त्यामुळे मी तेथे जावून बघितले असता माझी मुलगी अमीर अजीज शेख (रा. भोकर, ता. श्रीरामपूर) याच्यासोबत बसलेली दिसली.
तु इकडे काय करते, असे मुलीला विचारले असता तिने सांगितले की, मला अमीर शेख हा त्याच्यासोबत घेवून आला आहे. याबाबत अमीर शेख यास विचारणा केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. अमीर शेख याने माझ्या मुलीस फुस लावून या ठिकाणी आणले असल्याची आमची खात्री पटली. मी मुलीला विचारले असता तिने सांगितले की, अमीर शेख याने मला जुने फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली, मला विजय हॉटेल येथे घेवून आला. त्यानंतर मुलीचा मोबाईल पाहीला असता त्यात मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे फोटो काढलेले दिसून आले.
याअगोदरही सदर तरुण माझ्या मुलीचे फोटो काढून बदनामी करत होता. त्या प्रकाराबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे दि. 04 जानेवारी रोजी तक्रार देखील दिली होती. त्यावेळी गावातील नातेवाईकांनी मध्यस्ती करुन वाद मिटविला होता. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सदर तरुणाविरुध्द पोस्को अंतर्ग तसेच अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Minor girl threatened to make photo viral