‘लिव्ह इन’ मध्ये राहणारी अल्पवयीन मुलगी गर्भवती
Nagpur Crime: दुसऱ्यांदा मुलगी गर्भवती (pregnant) झाल्यामुळे ती गर्भपात करण्यासाठी गेली असता ती अल्पवयीन असल्याचा खुलासा.
नागपूर: अल्पवयीन असताना ‘लिव्ह इन’मध्ये राहिल्यानंतर एक बाळ झाले. दोन वर्षांपासून दोघेही सोबत राहतात; परंतु दुसऱ्यांदा मुलगी गर्भवती झाल्यामुळे ती गर्भपात करण्यासाठी गेली असता ती अल्पवयीन असल्याचा खुलासा झाला. पोलिसांनी आरोपीस अटक केली.
कैलास राजकुमार अडमाचे (२५) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने अल्पवयीन १७ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला १४ फेब्रुवारी २०२० ते २७ मार्च २०२३ दरम्यान आपल्या घरी नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून मुलीला एक बाळ झाले. दोघेही दोन वर्षांपासून ‘लिव्ह इन’मध्ये राहत होते. त्यानंतर मुलगी पुन्हा गर्भवती झाली. गर्भपात करण्यासाठी ती रुग्णालयात गेली असता तेथे ती अल्पवयीन असल्याचे डॉक्टरांना समजले. त्यांनी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. पीडित मुलीला तिच्या आईसोबत पाठविले आहे.
Web Title: minor girl living in a ‘live-in’ is pregnant
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App