Home अहिल्यानगर अहिल्यानगर: मुलगी घरातून पेप्सी आणण्याच्या बहाण्याने बाहेर गेली आणि परत आलीच नाही

अहिल्यानगर: मुलगी घरातून पेप्सी आणण्याच्या बहाण्याने बाहेर गेली आणि परत आलीच नाही

Breaking News | Ahilyanagar Crime: एका अल्पवयीन मुलीला (वय १५) अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना.

minor girl being lured and abducted by an unknown person

अहिल्यानगर: शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका अल्पवयीन मुलीला (वय १५) अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना रविवारी (१८ मे) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

पीडित अल्पवयीन मुलीच्या बहिणीने या प्रकरणी सोमवारी (१९ मे) पहाटे दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचे आई-वडील मयत झाले असून त्यांच्यावरच कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यांची अल्पवयीन बहिण ही अहिल्यानगर शहरातील एका हायस्कूलमध्ये शिकत आहे. रविवारी ती घरातून पेप्सी आणण्याच्या बहाण्याने बाहेर गेली आणि परत आलीच नाही. आजीने फिर्यादीला ही माहिती दिल्यानंतर फिर्यादीने शहरात सर्वत्र तिचा शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही. त्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेले असल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे. पोलीस मुलीचा शोध घेत आहे.

महत्वाचे: नवनवीन फिचर मिळविण्यासाठी आजच आपला अॅप अपडेट करा. येथे क्लिक करा. 

श्रीरामपूर: ३५ वर्षीय तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

श्रीरामपूर: तालुक्यातील उंदीरगाव येथे एका ३५ वर्षीय तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. अंबादास मुरलीधर आव्हाड असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून अंबादास याने गळफास घेतल्याने त्यांना तात्काळ शहरातील साखर कामगार हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय तपासणी करून डॉक्टरांनी त्याला मयत म्हणून घोषित केले. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Breaking News: minor girl being lured and abducted by an unknown person

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here