Shankarrao Gadakh: मंत्री शंकरराव गडाख रुग्णालयात दाखल
Ahmadnagar: मंत्री शंकरराव गडाख यांच्या मणक्यात वेदना होत असल्याने त्यांना रिलायंस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मतदान प्रक्रिया पार पाडून ते रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहे.
विधानपरिषदेच्या सहा रिक्त जागांसाठी सध्या मतदान प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी मुंबईत गेलेले राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांच्या मणक्यात वेदना होत असल्याने त्यांना रिलायन्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विधानपरिषदेच्या मतदानाची प्रक्रिया आज सकाळपासून सुरू आहे. शिवसेनेचे सर्व आमदार ताज हॉटेलमध्ये होते. मंत्री गडाख हे मतदानासाठी येत असताना त्यांचे वाहन स्लीप झाले. त्यामुळे त्यांच्या मणक्याचा त्रास होत असल्याचे सांगितले जात आहे.
त्यांना स्लीप डिस्कची समस्या निर्माण झाली आहे. त्यांना मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुंबईत ढगाळ वातावरण व पावसाला सुरवात झाल्यामुळे वाहन स्लीप झाल्याचे समजते. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी ते इतर आमदारांचा आधार घेत विधानभवनातील मतदान केंद्रावर पोहचले. तेथे त्यांनी मतदान केले. त्यानंतर ते रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत.
Web Title: Minister Shankarrao Gadakh admitted to Hospital