Home महाराष्ट्र Marataha Reservation: संभाजीराजेचा अल्टिमेटम, ६ जूनपर्यंत मराठा आरक्षणावर निर्णय घेतला नाही तर

Marataha Reservation: संभाजीराजेचा अल्टिमेटम, ६ जूनपर्यंत मराठा आरक्षणावर निर्णय घेतला नाही तर

Martaha Reservation Sambhajiraje altimet to gov

Marataha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी महाराष्ट्राचा दौरा करून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटी दिल्या. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस, राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार, राज ठाकरे, आदी अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्यानंतर मराठा आरक्षण संदर्भातील भूमिका मांडत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

६ जून शिवराज्याभिषेक दिनी मराठा समाजाची निर्णायक भूमिका रायगडावरून जाहीर करणार असल्याचे संभाजीराजेंनी म्हंटले आहे. ६ जून पर्यंत मराठा आरक्षणंबाबत निर्णय घेताला नाही तर आमची आंदोलनाची भूमिका रायगडावरून सुरुवात होणार आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून द्या आम्हाला बाकी काय देण घेणं नाही. वेळ पडली तर मराठा समाज कायदा देखील हातात घेतील. आज माझ्यामुळे शांत आहेत. मराठा समाज असवस्थ आहे, दुखी आहे. त्यांस वेठीस धरू नका. आरक्षणासाठी दोन दिवसांचे अधिवेशन घ्यावे अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्व आमदार खासदारांना चर्चेसाठी बोलवावे.

Web Title: Martaha Reservation Sambhajiraje altimet to gov

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here