Home महाराष्ट्र १० दिवसांवर विवाह, पत्रिकाही वाटल्या अन्‌ तरुणीची प्रियकरासोबत आत्महत्या

१० दिवसांवर विवाह, पत्रिकाही वाटल्या अन्‌ तरुणीची प्रियकरासोबत आत्महत्या

Marriage,invitation and a young woman commits suicide with her boyfriend

रावेर | जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील विश्राम जिन्सी या आदिवासी वस्तीतील एका प्रेमीयुगुलाने गावाजवळील शेतात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची खळबळजनक घटना शनिवारी (ता. २३) समोर आली. युवक आणि युवती हे दोघेही एकाच कुटुंबातील असल्याने त्यांच्या विवाहास घरच्यांचा विरोध होता, यामुळे त्यांनी एकत्रित आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरीही युवकाच्या वडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने दोघांचे मृतदेह जळगाव येथे इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले आहेत.

रावेर-रसलपुर-अभोडामार्गे पालकडे जाणाऱ्या रस्त्यावर विश्राम जिन्सी हे गाव आहे. या गावातील मुकेश पवार (वय २५) आणि गायत्री परशुराम पवार (वय १८) यांचे एकमेकांवर प्रेम होते. शुक्रवारी (ता. २२) रात्री सायंकाळपासून हे दोघेही घरातून निघून गेले होते. त्यांच्या नातेवाईकांनी रात्रभर सर्वत्र शोध घेतला. मात्र ते आढळून आले नव्हते. युवकाचे वडील सकाळी त्यांच्या शेतात शोध घेण्यासाठी गेले असता शेतातील झाडावर दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचे आढळून आले. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती देताच पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेह उतरवून रावेर येथे शवविच्छेदनासाठी आणले असता मृत मुकेशच्या वडिलांनी या आत्महत्या नसून त्यांना मारहाण केली असावी, यात काहीतरी घातपाताचा प्रकार असावा असा संशय व्यक्त केल्याने व त्यांच्या इन कॅमेरा शवविच्छेदनाची मागणी केल्याने दोघांचे मृतदेह दुपारी शवविच्छेदनासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहेत.

मुकेश आणि गायत्री यांचे पणजोबा सख्खे भाऊ होते. यामुळे ते दोघेही एकाच कुटुंबातील म्हणजेच दूरच्या नात्याने का असेना पण एकमेकांचे बहिण-भाऊ नात्याने लागत असल्याने त्यांच्या विवाहास घरच्यांकडून विरोध होता. त्यातच गायत्रीचा विवाह ४ मे रोजी मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर जवळील एका तरुणाशी होणार होता असे समजले. या विवाहाच्या पत्रिकाही वाटल्या गेल्या होत्या. अन म्हणून दोघांनी एकत्रित आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त होत आहे. विवाहाला अवघे १० दिवस बाकी असताना युवतीची आत्महत्या झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Web Title: Marriage,invitation and a young woman commits suicide with her boyfriend

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here