विवाहबाह्य संबंध: दुसरे लग्न करण्यासाठी पित्यानेच केली मुलाची हत्या
Crime News: तरुणाने विवाहबाह्य संबंधातून मुलाला जीवे मारल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन दिवसांपूर्वी मृतदेह प्लास्टिक पिशवीमध्ये भरून वर फेकून दिल्याची घटना उघडकीस.
मुंबई : सायन-माहीम लिंक रोड परिसरात सापडलेल्या लहान मुलाच्या मृतदेहाचे गूढ उलगडले आहे. 22 वर्षीय तरुणाने विवाहबाह्य संबंधातून मुलाला जीवे मारले. ज्या तरुणीशी विवाहबाह्य संबंध ठेवले होते, त्या तरुणीने लग्नाआधी पत्नी आणि लहान मुलाचा कायमचा बंदोबस्त करण्याची अट घातली होती. तिचा शब्द पाळण्यासाठी तरुणाने आपल्या 2 वर्षाच्या मुलाची हत्या करून मृतदेह प्लास्टिक पिशवीमध्ये भरून माहिम लिंकरोडवर फेकून दिल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता (IPC) कलम 302 (हत्या), 362 (अपहरण) आणि अन्य कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुलगा बेपत्ता झाल्याने त्याचे नातेवाईक सकाळी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार देण्यासाठी गेले. यावेळी पोलिसांना मुलाची ओळख पटली. यानंतर पोलिसांनी मुलाच्या हत्येबाबत तपास सुरू केला. मुलाच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता, त्याचे वडील धारावी झोपडपट्टीत राहत असल्याचे त्यांना कळले. त्यानंतर पोलिसांनी बापाला पकडले. आरोपी कपड्याच्या कारखान्यात शिंपी म्हणून काम करत होता. तेथे त्याचे एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. मात्र महिलेने त्याला अट घातली की, तिच्याशी लग्न करायचे असल्यास त्याला पत्नी आणि मुलाला त्याच्या आयुष्यातून काढावे लागेल. त्यानंतर आरोपीने मुलाच्या हत्येचा कट रचल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
आरोपी चॉकलेटचे आमिष दाखवून पत्नीकडून मुलाला घेऊन गेला आणि त्याची हत्या केली. त्यानंतर मुलाचा मृतदेह माहीमच्या खाडीजवळ फेकून दिल्याचे त्याने सांगितले. दुसऱ्या दिवशी मुलाची आई आपल्या नातेवाईकांसह पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यास आल्यानंतर सर्व प्रकार समोर आला आहे.
Web Title: marital affair Son murder by Father himself for remarriage
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App