अहमदनगर जिल्ह्यात ९ मे पासून मराठा आरक्षणसंदर्भात आंदोलन: संभाजी दहातोंडे
नगर जिल्ह्यात ९ मे पासून गावबंद आंदोलन
अहमदनगर | Maratha Reservation: मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयाने रद्ध केल्यामुळे मराठा समाजातून संतापाची भावना व्यक्त होत आहे. मराठा क्रांती मोर्चा समिती, मराठा महासंघाचे कार्यकर्ते संतप्त झाले आहे. राज्य सरकारने योग्य भूमिका न मांडल्यामुळे आरक्षण रद्द झाल्याचा निषेध करत महासंघातर्फे ९ मे पासून नगर जिल्ह्यातून आंदोलानाला सुरुवात केली जाणार आहे.
८ मे रोजी नगर येथे मराठा क्रांती मोर्चा, मराठा महासंघ, शेतकरी मराठा महासंघ यांची बैठक आयोजित केली असल्याची माहिती शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराव दहातोंडे पाटील यांनी दिली.
ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार, मराठा समाजाच्या कुटुंबातील अनेक तरुणांच्या आशेवर पाणी फेरले आहे. अनेक वर्षांच्या लढाईवर विरजण पडले आहे. महाराष्ट्र सरकारने न्यायालयात मराठा समाज मागास कसा आहे हे प्रभावीपणे न मांडल्यामुळे मराठा आरक्षण रद्द करण्यात आले आहे. भाजपने आरक्षण दिले मात्र या सरकारला ते टिकविता आले नाही.
मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे महाराष्ट्र सरकार नेमके काय करणार? राज्य सरकारची नेमकी भूमिका काय असणार हे शासनाने मांडावे अशी मागणी करत मराठा आरक्षण रद्द निषेधार्थ ९ मे पासून मराठा महासंघ शेतकरी मराठा मराठा महासंघ, मराठा समितीतर्फे गाव बंद आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी ८ मे रोजी नगर येथे शासकीय विश्रामगृहावर पदाधिकारी समन्वयकाची बैठक होणार आहे. त्यासाठी सर्ब समन्वयकानी बैठकीला हजर राहावे असे आवाहन संभाजी दहातोंडे यांनी केले आहे.
Web Title: Maratha Reservation Village closure agitation in Ahmednagar