सदावर्तेंच्या गाड्यांच्या तोडफोडीचे समर्थन नाही, मनोज जरांगे
Maratha Reservation: सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्या अटकेची मागणी केली.
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आज मराठा आंदोलकांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्या अटकेची मागणी केली आहे. यावर जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे म्हणाले, मला काहीच माहित नाही मी आता झोपेतून उठलो. मराठा शांततेत आंदोलन करत आहे. हजारो गावात आंदोलन सुरु आहे. कोणी गाडी फोडली असेल तर त्याचे समर्थन होणार नाही. सरकारने आरक्षणाचा विषय संपवावा.
मराठ्यामध्ये माणुसकी जिवंत आहे. मराठ्यांनी सरकारचे खूप लाड केले. त्यांचे पोरबाळं आम्ही मोठे केले. समाजातील कोण कोण श्रद्धेय मराठ्यांना आरक्षण मिळवू देत नाहीत हे सर्वांना माहित आहे. मराठा समाजाने या श्रद्धेयांना खूप मोठं केलं आहे. खूप लाड आहेत. ते आता विमानाने फिरतात. मराठ्यांनी मोठं केल्यामुळे त्यांचे मुलं श्रीमंतीत जगतात. यांची काही दिवसात मी समोर आणणार आहे. सगळ्या राजकीय पक्षाची लोक, सत्तेतील लोक मराठ्यांना मोठं होऊ देत नाहीत, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला
आरक्षण द्यायचे नव्हते तर वेळ मागायचा नव्हता. आधीच ५० वर्षाचा वेळ द्यायचा होता. आम्ही ४ दिवसांचा वेळ दिला तुम्ही १ महिन्याचा वेळ मागितला. आम्हाला नाटकं शिकवू नका. तुम्ही आमच्या दारात यायचं नाही तुम्ही आमच्या दारात येऊ नका, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी केला. मराठ्यांनी आत्महत्या करू नये. शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
Web Title: Maratha Reservation no support for the vandalism of Sadavarten trains, Manoj Jarange
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App