महसूलमंत्री थोरातांच्या घरासमोर त्यांचे मेहुणे व बहीण बसले आंदोलनास
Maratha Kranti Morcha | Sangamner: शनिवारी नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयक यांच्यात बैठक पार पडली, या बैठकीत काही महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी २ ऑक्टोबर ला आमदार व खासदार यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शिवाजीनगर संगमनेर येथील निवास स्थान समोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलनास सरुवात केली आहे. त्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची बहीण नगरध्यक्षा दुर्गाताई तांबे व मेहुणे आमदार डॉ. सुधीर तांबे सहभागी झाले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली आहे.एक मराठा लाख मराठा अशी पोस्टर व घोषणा करत निदर्शने करण्यात आली.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Maratha Kranti Morcha sister sat in front of Minister Thorat’s house