Maharashtra Lockdown: राज्यात १५ जुनपर्यंत निर्बंध कायम
Maharashtra Lockdown: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी फेसबुक लाइवद्वारे संवाद साधला. संख्या कमी झाली असली तरी संकट कमी झालेले नाही.
उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे आभार मनात जी जनता आपल्यावर प्रेम करते त्यांच्यावर निर्बंध लादण्याचे कटू काम नाइलाजाने करावे लागत आहे. रुग्णसंख्या गेल्या वेळच्या तुलनेत अधिक आहे. यावेळी आपण कडक निर्बंध लावले आहेत. लॉकडाऊन केलेला नाही, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढताना दिसते तर काही जिल्ह्यात कमी झालेली आहे. तसेच ग्रामीण भागात हलकी वाढताना दिसत आहे. राज्यातील निर्बंध १५ जून पर्यत कायम असणार आहे. ज्या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अधिक कमी आहे तिथे निर्बंध शिथिल करण्यावर तर जिथे जास्त आहे तिथे निर्बंध अधिक कठोर केले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ज्यांना रस्त्यावर उतरवायचे आहे त्यांनी कोरोना योद्धा म्हणून उतरावे असेही ते यावेळी म्हणाले.
Web Title: Maharashtra Lockdown upto 15 Jun