Home क्राईम ‘एक दुजे के लिए’! प्रेमीयुगुलाने एका झाडावर, एकाच दोराने घेतला गळफास

‘एक दुजे के लिए’! प्रेमीयुगुलाने एका झाडावर, एकाच दोराने घेतला गळफास

Buldhana Crime News: अल्पवयीन प्रेमीयुगुलाने एकाच झाडाला व एकाच गळफासाने आत्महत्या (Suicide) केल्याचे आढळून आले.

lovers hanged themselves on a tree with a single rope Suicide

बुलढाणा : गाजलेल्या ‘एक दुजे के लिए’ या चित्रपटाच्या शोकांतिकेची आठवण करून देणारी दुर्दैवी घटना समोर आली आहे.  जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या आदिवासीबहुल कहू पट्टा येथे ही समाजमनाला सुन्न करणारी घटना घडली आहे.

अल्पवयीन प्रेमीयुगुलाने एकाच झाडाला व एकाच गळफासाने आत्महत्या केल्याचे आढळून आले. आकाश पन्नालाल डाबर व प्रियंका भाईलाल मसाने अशी त्यांची नावे आहेत. थानसिंग मोरे यांच्या शेतात त्यांनी अज्ञात कारणावरून सामूहिकपणे जीवन संपवले.

आदिवासी ग्रामस्थांनी सुनगावचे पोलीस पाटील तडवी यांना माहिती दिली. तडवी यांनी घटनास्थळी धाव घेत जळगाव पोलिसांना माहिती दिली. एपीआय कैलास चौधरी, पीएसआय शिवानंद वीर, जमादार शेगोकार वावगे यांनी घटनास्थळी धाव घेत या प्रेमीयुगुलाचे मृतदेह खाली उतरवले. घटनेची तक्रार मृत आकाशचे काका सखाराम डावर यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्याला दिली. प्रेमीयुगुलाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.  तपास ठाणेदार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: lovers hanged themselves on a tree with a single rope Suicide

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here