Home महाराष्ट्र प्रेमविवाह, संसारात खटके, पत्नीची विहिरीत उडी, पती वाचवायला गेला अन दोघांचा मृत्यू

प्रेमविवाह, संसारात खटके, पत्नीची विहिरीत उडी, पती वाचवायला गेला अन दोघांचा मृत्यू

Breaking News | Chandrapaur: रागाच्या भरात पत्नी विहिरीकडे निघाली. तिच्या पाठोपाठ पतीही गेला. पत्नीने विहिरीत उडी घेतली तिला वाचवायला पतीनेही विहिरीत उडी घेतली. यात दोघांचाही मृत्यू.

Love marriage, troubles in the world, wife jumps suicide

चंद्रपूर : दोघांचे एकमेकांवर प्रेम होतं. समाजाचे बंधन झुगारून तीन महिन्यापूर्वी त्यांनी आंतरजातीय विवाह केला. मात्र शनिवारची रात्र त्यांच्यासाठी काळ रात्र ठरली. दोघात वाद झाला. रागाच्या भरात पत्नी विहिरीकडे निघाली. तिच्या पाठोपाठ पतीही गेला. पत्नीने विहिरीत उडी घेतली तिला वाचवायला पतीनेही विहिरीत उडी घेतली. यात दोघांचाही मृत्यू झाला आहे.  ही हृदयदायक घटना गोंडपीपरी तालुक्यातील पानोरा या गावात शनिवारला रात्री १० वाजता घडली. प्रकाश शरबत ठेंगणे आणि उषा प्रकाश ठेंगणे असं मयत दोघांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या पानोरा गावातील प्रकाश ठेंगणे यांचे इल्लूर गावातील उषा हिच्यावर प्रेम जडले. दोघे आंतरजातीय होते. तीन महिन्यापूर्वी ते दोघे विवाह बंधनात अडकले होते. शनिवारी २४ ऑगस्टला रात्री दोघात वाद झाल्याची चर्चा आहे. रागाचा भरात उषा विहिरीकडे निघाली. तिच्या पाठोपाठ प्रकाश गेला. काही कळायचा आत उषाने विहिरीत उडी घेतली. तिला वाचविण्यासाठी प्रकाशने प्रकाशने विहिरीत उडी घेतली. यात दोघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती गोंडपिपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांना देण्यात आली. कर्मचाऱ्यासह त्यांनी घटनास्थळ गाठले. रात्री उशिरापर्यंत दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Love marriage, troubles in the world, wife jumps suicide

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here