Home पुणे प्रेमाच्या जाळ्यात अन तीन कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबध ठेऊन केला खंडणीचा खेळ, महिला...

प्रेमाच्या जाळ्यात अन तीन कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबध ठेऊन केला खंडणीचा खेळ, महिला कंडक्टर अटकेत

Breaking News | Pune Crime: महिला कंडक्टरने आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या शरीराचा वापर करून रोहित संजय कदम, मनोज सुकणे आणि भगवान इबिते यांची मोठी फसवणूक.

love, he had physical relations with three employees and played a game of extortion

पुणे: हनीट्रैपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या पीएमपीएमएलच्या एका महिला कंडक्टरला निलंबित करण्यात आले आहे. पीएमपीएमएलच्या पुणे स्टेशन आगारातील महिला वाहक कर्मचारीने तिघांची फसवणूक केली आणि त्यांच्याकडून खंडणी वसूल केली. या महिला कंडक्टरने आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या शरीराचा वापर करून रोहित संजय कदम, मनोज सुकणे आणि भगवान इबिते यांची मोठी फसवणूक केली. या महिलेने आर्थिक पिळवणूक करून त्यांच्याकडून मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम अशी खंडणी उकळली.

या बाबतच्या भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यामध्ये १७ सप्टेंबरला महिला कंडक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या महिलेविरोधात बलात्काराची खोटी केस करण्याची धमकी देणे, खंडणीची मागणी करणे तसेच रोहित कदम यांच्याविरुध्द पोलिस स्टेशनमध्ये खोटी तक्रार करणे या सर्व आरोपांबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.

आरोपी महिला कंडक्टरविरोधात दाखल केलेल्या गंभीर गुन्ह्याचे स्वरूप पाहता तिच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. या गंभीर गुन्ह्याचे स्वरूप पाहता भारती विद्यापीठ पोलिसांनी महिलेविरोधात तात्काळ कारवाई केली. त्यानंतर या महिलेने हनीट्रॅपच्या माध्यमातून केलेली फसवणूक आणि दाखल गुन्हा तसेच अटक कारवाई विचारात घेवून पीएमपी महामंडळ प्रशासनाकडून चौकशीसाठी महिलेला निलंबित करण्यात आले आहे. याबाबत आज पीएमपीएमएल प्रशासनाने निलंबन पत्र काढले आहे.

Breaking News: love, he had physical relations with three employees and played a game of extortion

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here