Home महाराष्ट्र Lockdown in Maharashtra: राज्यात सरसकट लॉकडाऊन हटविला जाणार नाही तर

Lockdown in Maharashtra: राज्यात सरसकट लॉकडाऊन हटविला जाणार नाही तर

Lockdown in Maharashtra entire lockdown will not be End

Lockdown in Maharashtra: कोरोना विषाणूच्या पार्शभूमीवर राज्यातील लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात सरसकट लॉकडाऊन हटविला जाणार नाही तर काही निर्बंध शिथिल करण्यात येतील अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली यामध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी लॉकडाऊन वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले तसेच याबाबाबत मंत्रीमंडळात चर्चा झाली असून येत्या दोन दिवसांत लॉकडाऊन संदर्भात नियमावली जाहीर केली जाईल. सर्वच मंत्र्यांचे एकमत झाले की, लॉकडाऊन लगेच काढणे शक्य होणार नाही असे राजेश टोपे यांनी सांगितले. सध्या आहे त्या निर्बंधामध्ये शिथिलता आणण्याचा विचार झाला आहे. यासंदर्भात नियमावली दोन दिवसांत जाहीर होणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

Web Title: Lockdown in Maharashtra entire lockdown will not be End

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here