Home अहिल्यानगर बिबट्याची दहशत वाढली, पुन्हा एका महिलेचा मृत्यू, गावकरी संतापले

बिबट्याची दहशत वाढली, पुन्हा एका महिलेचा मृत्यू, गावकरी संतापले

Breaking News | Kopargaon: बिबट्याच्या हल्ल्यात 60 वर्षीय शांताबाई निकोले या महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी घडली.

Leopard terror increases, another woman dies

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात 60 वर्षीय शांताबाई निकोले या महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी घडली आहे. संतप्त ग्रामस्थांनी 3 तास नगर – मनमाड महामार्ग अडवल्याने नगर – मनमाड महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बिबटयाला ठार मारण्याचे आदेश मिळाल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांना आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यानंतर पोलिसांच्या वतीने वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.

वनविभागाकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली असून वनअधिकारी, वनकर्मचारी तसेच नागरिकांच्या मदतीने शोध मोहीम सुरू आहे. नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यासोबत परिसरातील इतर बिबटेही जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी असून वनविभागात कशा पद्धतीने पुढील कार्य करणार आणि किती दिवसात बिबट्या ठार किंवा जेरबंद होणार त्याकडे नागरिकांचे लक्ष लागलं आहे. आज सकाळपासून माजी आमदार स्नेहलता कोल्हे त्यानंतर आमदार आशुतोष काळे, युवा नेते विवेक कोल्हे सुमित कोल्हे या सर्वांनी घटनास्थळी भेट दिली असून आजी-माजी आमदारांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करत सदर बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. सहाय्यक जिल्हा वनअधिकारी तसेच डीवायएसपी तहसीलदार आदींसह दोन्ही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घटनास्थळी हजर होते.

Breaking News: Leopard terror increases, another woman dies

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here