कुटुंब बाहेरगावी, जेवणाचं पार्सल घेऊन वकील निघाला घरी; पुलावर मृत्यूनं गाठलं
Ahmednagar Accident: नगरच्या उड्डाणपुलावरील अपघातात वकिलाचा मृत्यू, अज्ञात वाहनाने दिली धडक : अनिरुद्ध टाक एकटेच होते दुचाकीवर
अहमदनगर : येथील उड्डाणपुलावर सक्कर चौकादरम्यान धडक अपघातात वकिलाचा मृत्यू झाला. अॅड. अनिरुद्ध रामचंद्र टाक (४४, रा. विनायकनगर, निलायम हाउसिंग सोसायटी, नगर) असे मृत वकिलाचे नाव आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडला.
दुचाकीवरून चांदणी चौकातून टाक सक्कर चौकाकडे जात होते. या दरम्यान अज्ञात वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात अँड. टाक यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच नागरिक मदतीसाठी धावले. यावेळी तेथून उद्योजक हरजिसिंग वधवा हे जात होते. होते. ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी थांबून मदत केली. मृतदेहाची ओळख पटत नव्हती. वधवा यांनी शोधाशोध केली. मयत व्यक्तीच्या खिशात वाहन परवाना आढळून आला. त्यावर अनिरुद्ध रामचंद्र टाक, असे नाव होते.
त्यावरून टाक यांची ओळख पटली. ते एकटेच दुचाकीवरून प्रवास कर दुचाकीला जेवणाचे पार्सल आढळून आल्याचे प्रत्यक्षदर्शी उद्योजक वधवा यांनी सांगितले. दरम्यान, भिंगार पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात पाठविला. अॅड. टाक हे कामगार न्यायालयात वकिली करत होते.
अनिरुद्ध टाक यांच्या मोबाईलमधील नंबर शोधून हरजीतसिंह आणि पोलीस यांनी टाक यांच्या नातेवाईकांशी संपर्क केला. टाक यांचे कुटुंबीय बाहेर गावी गेलेले असून टाक एकटेच घरी होते. त्यामुळे अन्य नातेवाईक तेथे आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील प्रक्रिया सुरु केली. ऍड टाक अहमदनगरच्या कामगार न्यायालयात वकिली करत होते.
Web Title: Lawyer dies in accident on a city flyover
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App