अकोले: कमळाला मतदान करा नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करायचे: वैभवराव पिचड
अकोले: देशातील सामान्य जनतेचा विकास करायचा, गरिबी हटाव, भाजप सरकार हे विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान अठरा तास काम करीत आहे. तसेच मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना आपल्याला विकासासाठी मदत करायची आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायची आहे ही ताकद फक्त भाजप सरकारमध्ये आहे असे प्रतिपादन वैभव पिचड यांनी केले.
तसेच मुख्यमंत्री यांनी आपल्याला तालुक्याचा विकास करण्यासाठी शब्द दिलेला आहे. तालुक्याचा कायापालट आपण करून दाखवणार असे वैभव पिचड यांनी सांगितले त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी मतदान केले पाहिजे लोकशाहीचा हक्क बजाविला पाहिजे. भाजपा सरकारला मतदान म्हणजे विकासाला मतदान असे प्रतिपादन वैभव पिचड यांनी केले. कमळ या चिन्हाला मतदान करून विकासाला चालना दिली पाहिजे. आपल्या तालुक्याला विकास पाहिजे म्हणूनच आपण भाजपामध्ये गेलो असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Website Title: Latest News fulfill Narendra Modi’s dream Vaibhavrao Pichad