अकोले सावकारशाही प्रकरण: आभाळेच्या आत्महत्या चौकशीसाठी गुन्हा नोंदविण्याचे आदेश
अकोले: व्यापारी राजेंद्र आभाळे यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी मनीषा आभाळे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे १० जणांविरुद्ध तक्रार केली. महानिरीक्षकांनी गुन्हा नोंदविण्याचा आदेश दिल्याचे समजते.
व्यापारी राजेंद्र आभाळे यांनी ११ महिन्यांपूर्वी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली होती. सावकारी जाचातून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होती. पोलिसांना आभाळे यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली चिट्ठी सापडली. मात्र कोणतीही तक्रार न आल्याने हे प्रकरण थंड बस्त्यात पडले होते. मनीषा आभाळे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांची भेट घेऊन पती राजेंद्र आभाळे खासगी सावाकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार केली त्यात शहरातील १० जणांची नावे असल्याचे समजते.
आभाळे यांच्या मृत्यू नंतर देखील काही पठाणी सावकार शाहीने पठाणी वसुली सुरु ठेवली असून या कुटुंबाला सावकारशाहीच्या जाचातून अजूनही मुक्तता मिळालेली नाही. राजू आभाळेचा मृत्यू अकोले शहरातील व शहरालगत असणाऱ्या गावातील अनधिकृत सावकार शाहीने बळी घेतला आहे. त्यांच्या मृत्यू नंतर खासगी सावकार शांत बसतील अशी चर्चा सुरु होती. मात्र पत्नी व मुलांना आभाळे यांच्या घरी येऊन मातोश्री व पत्नी व मुलांना अद्यापही त्रास दिला जात आहे. एका महिन्यात दिलेल्या रकमेची दाम दुप्पट मिळत असून बँकेपेक्षा खासगी सावकारशाहीने लवकर श्रीमंत होता येते. यामुळे अनेक गोर गरीब कुटुंब संपुष्टात आले. तरी देखील हि सावकारशाही कुटुंबाला त्रास देत आहे. वाल्मिक आरोटे, राजू आभाळे, प्रथमेश भोसले या तिघांचा सावकारशाहीमुळे बळी गेला तरी हे सावकार ऐकण्यास तयार नाहीत. तर अकोले शहर व ग्रामीण ग्रामीण भागात सावकारशाहीचा बंदोबस्त घालण्यास आता पोलीस महानिरीक्षकांनी मोठे पाउल उचलेले असून सावकारांवर कारवाई होणार का याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून आहे.
Website Title: Latest News Bureaucratic Case in Akole