चमकोंना लगाम: मदत वाटपाचे फोटो काढल्यास कारवाई: राहुल द्विवेदी
अहमदनगर: लॉकडाऊन असताना किराणा कीटस, मास्क, फूड पाकेट आदी वस्तूची मदत देताना फोटो काढून प्रसारमाध्यमे व सोशियल मेडीयावर टाकल्यास कारवाई केली जाणार आहे. दोन पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास व जास्त व्यक्तींचे फोटो काढून टाकल्यास फोटोतील सर्वांवर कारवाई करण्यात येणार आहे असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आदेशच काढले आहेत.
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बरेचसे लोक हातावर असलेले सरकारच्या, स्वयंसेवी संस्थांच्या व दानशुरांच्या मदतीवरच अवलंबून आहेत. मदतीचा ओघ सर्वत्र सुरु आहे. मात्र ही मदत देताना एकत्रित येऊन फोटो व व्होडीयो काढून स्वतः ची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी केली जाते. त्यामुळे मदत कार्यामागे प्रसिद्धी करून घेणाऱ्याना चांगलाच चोप लागविन्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आदेशच जारी केला आहे. हे वाटप करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडविले जातात मोठ्या प्रमाणात गर्दी करून प्रसिद्धीसाठी एकत्र येतात. बरचसे लोक तर चमकण्यासाठी मदत करून प्रसारमाध्यमे व सोशियल मेडीयावर फोटो प्रसारित करतात. गर्दी करणे, सोशल डिस्टन्स न पाळणे यामुळे करोनाचा प्रसार होईल असे कृत्य होत आहे. त्यामुळे आता फोटो प्रसारित केल्याससुद्धा कारवाई केली जाणार आहे असे आदेशात म्हंटले आहे.
Website Title: Latest News Action to take help photos taken