सेमी हायस्पीड पुणे संगमनेर नाशिक रेल्वेसाठी जमीन मोजणी
संगमनेर: देशातील पहिल्या सेमी हाय स्पीड पुणे नाशिक या रेल्वेमार्गासाठी संगमनेर तालुक्यातील पठार भागात जमीन मोजणीची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे बहुप्रतीक्षेत असलेल्या रेल्वेमार्गाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.
सोमवारपासून प्रत्यक्ष जमीन मोजणीला सुरुवात करण्यात आली आहे. प्रत्यक्ष आवश्यक जमिनीचे मोजमाप व त्याचे मूल्य निश्चितीकरण झाल्यानंतर पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यातील जमिनीची खरेदीला सुरवात होणार आहे. संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ या गावात या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी राज्य शासनाने या पूर्वीच वित्तीय मान्यता दिलेली आहे.
२३५ किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग पुणे अहमदनगर नाशिक जिल्ह्यातून जाणार आहे. दोनशे किलोमीटर प्रतितास वेग, पुढे हा वेग २५० किलोमीटर पर्यंत वाढविता येणार आहे, पुणे ते नाशिक हे अंतर अवघ्या पावणे दोन तासांत काटता येणार आहे. पुणे नाशिक दरम्यान २४ स्थानके, १८ बोगदे, ४१ उड्डाणपूल व १२८ भुयारी मार्ग प्रस्थापित आहे. विद्युतीकरणसह एकत्रित दुहेरी मार्गाचे काम होणार आहे.
ज्या शेतकऱ्यांची जमीन, घरे, विहीर, झाडे या रेल्वे प्रकल्पात जाणार आहेत त्यांना किती भरपाई मिळणार याबाबत अद्याप माहिती शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही.
Web Title: Land Survey for Semi High Speed Pune Sangamner Nashik Railway