Theft: संगमनेर तालुक्यात मंदिरातील दान पेटी फोडून लाखोंची चोरी

Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पठार भागातील चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. पठार भागातील माळेगाव येथील काळभैरवनाथ मंदिरातील दान पेटी फोडून लाखोची रक्कम तसेच सीसीटीव्हीचे डीव्हीआर चोरून (Theft) नेल्याची घटना बुधवारी ३० मार्च रोजी रात्री घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, माळेगाव येथे ग्रामस्थांचे श्रद्धास्थान काळभैरव महाराजांचे भव्य मंदिर आहे. या मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. बुधवारी रात्री ग्रामस्थांनी भजन केल्यानंतर मंदिर बंद करून घरी गेले होते. पहाटे पाच वाजेच्या सुमारास पुजारी सुभाष जाधव हे पूजा पाठ करण्यासाठी मंदिराकडे आले होते. तर त्यांना मंदिरातील लाईट बंद केलेली दिसली. त्यांनी ही बाब आजूबाजूच्या रहिवाशांना सांगितली. त्यांनी बघितले असता मंदिरातील दान पेटी फोडून त्यातील रोख रक्कम व सीसीटीव्हीचे डीव्हीआर चोरून नेल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले.
Web Title: Lakhs stolen from temple theft in Sangamner
















































