कोपरगाव | kopargaon: कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा येथे २५ फेब्रुवारी रोजी ११ वाजता कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखान्याची दारूच्या भरलेल्या बाटल्यांचे बॉक्स नांदेड जिल्ह्यात घेऊन जाणारया मालट्रकच्या चालकास मारहाण करून दारू चोरून नेण्यात आली.
याबाबत चालक शरद गोपीनाथ वरगुडे वय ४० कोपरगाव यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून योगेश कैलास खरात, संतोष गौतम खरात, धनंजय प्रकाश काळे व एक अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील वाल्मिक कुऱ्हे त्यांच्या मालकीचा दहा टायर ट्रक (एम.एच.४१. जी. ६३९१) हा संतोष खरात यांना विक्री केला होता. वाल्मिक कुऱ्हे यांनी विश्वासात घेत हा ट्रक संतोष खरात याला दिला होता. १ मार्च रोजी कागदपत्रे करायची होती. त्या ट्रकवर शरद वारघुडे हे चालक म्हणून होते. विक्री केल्यानंतरही वार्घूडे हेच चालक होते. त्यामुळे चालक वरगुडे यांनी २५ फेब्रुवारीला कर्मवीर शंकराव काळे या कारखान्यातून नांदेड जिल्ह्यात दारूचा माल पाठविण्य्साठी भाडे घेतले होते.
त्यानुसार त्या दिवशी चालक वरगुडे व योगेश खरात, धनंजय काळे यांनी दुपारी ३ वाजता ट्रक कारखान्यात नेऊन दारूचा माळ भरल्यानंतर रात्री दहा वाजेच्या सुमारास नांदेडच्या दिशेने निघाले ट्रक घेऊन झगडे फाटा येथे आले असता तेथे संतोष खरात आला होता. त्यावरून योगेश खरात याने चालकास मारहाण केली व उतरवून देत चौघे ट्रक घेऊन निघून गेले. या ट्रकमध्ये २६ लाख ४९ हजार ७४१ रुपयांची दारूचे बॉक्स होते.
Web Title: Kopargaon truck was hijacked