Accident: आयशर टेम्पो व दुचाकी अपघातात माजी सरपंचचा चिरंजीव मृत्यू
कोपरगाव | Accident: कोपरगाव तालुक्यातील मुंबई नागपूर राज्यमार्गावर संत जनार्दन स्वामी रुग्णालयाजवळ एका अज्ञात आयशर टेम्पोने हिरो होंडा गाडीला धडक दिल्याने या धडकेत संवत्सर लक्षमणवाडी येथील तरुण प्रवीण शिवाजीराव रोहोम वय २२ याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी दि. ६ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
मयत तरुण हा माजी सरपंच शिवाजीराव रोहोम यांचा मुलगा होता. संवत्सर येथील रहिवासी प्रवीण रोहोम हा सकाळी ९ वाजेच्या सुमारास मुंबई नागपूर राज्यमहामार्गावरील जात असताना त्याच्या मोटारसायकलला मागील बाजूने एका अज्ञात आयशर टेम्पोने जोराची धडक दिल्याने तो मागील टायरखाली सापडला. यामध्ये घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आयशर टेम्पो चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आर.पी. पुंड हे करीत आहे.
Web Title: Kopargaon Accident Ayashar tempo and bike