महिला कारमध्ये लिप्ट घेऊन बसली असता घडले असे काही
जामखेड | Jamkhed: एका महिलेस लिप्ट देण्याच्या बहाण्याने कारमधून बसवून तिच्या गळ्यातील दागिनेसह ६४ हजारांना लुटल्याची घटना घडली आहे. जामखेड तालुक्यातील खर्डा येथील बस स्थानकावर गावी जाणाऱ्या महिलेसोबत सोमवारी दिनांक ७ रोजी सायंकाळी साडे सहा वाजता ही ही दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी रविवारी दिनांक १३ डिसेंबर रोजी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी महिलेने जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून यानुसार सोमवारी दि. ७ डिसेंबर सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास आपल्या भूम तालुक्यातील नलेवडगाव येथे जाण्यासाठी खर्डा बस स्थानकावर वाहनाची वाट पाहत असताना एक जण तेथे कार घेऊन आला. त्याने या महिलेस गावी जाण्यासाठी लिप्ट दिली. वाहन पुढे जाऊन खर्डा किल्ल्याजवळ थांबवून आणखी अनोळखी चार व्यक्ती कारमध्ये बसले.
शेजारी बसलेल्या एका व्यक्तीने महिलेचे तोंड दाबले, इतर दोघांनी गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेतले. तिच्याकडे असलेले तीन हजार रुपये व मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतले. असा एकूण ६४ हजारांचा ऐवज लुटण्यात आला आणि त्या महिलेला सोडून दिले/
याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Web Title: Jamkhed woman was sitting in the car with a lift