Home अहमदनगर अहमदनगर: तरूणीला शिवीगाळ करत तिचा विनयभंग

अहमदनगर: तरूणीला शिवीगाळ करत तिचा विनयभंग

Ahmednagar Insulting the girl and Molestation

अहमदनगर | Ahmednagar:  भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणीला शिवीगाळ करत तिचा विनयभंग (Molestation) केल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री अहमदनगर शहरात ही घटना घडली या प्रकरणी तिघांविरूध्द विनयभंग (Molestation), शिवीगाळ, मारहाण आदी कलमान्वये तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

विवेक गावडे, महेश सोमवंशी (पूर्ण नावे माहिती नाही, दोघे रा. गावडे मळा, सावेडी) व सत्यजित ढवण (पूर्ण नाव माहिती नाही, रा. ढवणवस्ती, तपोवन रोड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पीडित तरूणीने फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार शनिवारी रात्री विवेक गावडे आणि सत्यजित ढवण हे दोघे फिर्यादी यांच्या वडिल आणि भावाला मारहाण करीत होते. तो आवाज ऐकुण फिर्यादी तेथे गेल्या. त्यावेळी विवेक हा त्यांना म्हणाला,‘तु बाजुला हो’, असे म्हणत त्यांच्या कुडत्याच्या कॉलरला पकडुन त्याचे जवळ ओढून विनयभंग केला. महेश सोमवंशी याने फिर्यादीच्या वडिलाला शिवीगाळ केली. आरोपींनी फिर्यादीचा भावाला व वडिलांना मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

Web Title: Ahmednagar Insulting the girl and Molestation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here