Home संगमनेर संगमनेर: इंदोरीकर महाराज पोलिसांना भेटेनात,  खटला लांबणीवर

संगमनेर: इंदोरीकर महाराज पोलिसांना भेटेनात,  खटला लांबणीवर

Sangamner News: कीर्तनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) भेटत नसल्याचा अहवाल संगमनेर तालुका पोलिसांनी आज न्यायालयात सादर, त्यामुळे सुनावणी लांबणीवर.

Indurikar Maharaj meets the police, the case is adjourned

संगमनेर: गर्भलिंग बाबत केलेले वादग्रस्त वक्तव्यामुळे निवृत्ती काशिनाथ देशमुख ऊर्फ इंदोरीकर महाराज त्यांच्याविरोधात संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये खटला दाखल आहे. त्या खटल्याच्या संदर्भाने आज, शुक्रवारी (दि. १३) त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले असल्याची माहिती समोर आली होती.

न्यायालयाने काढलेले तारखेला उपस्थित राहण्याचे समन्स बजावण्यासाठी कीर्तनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज भेटत नसल्याचा अहवाल संगमनेर तालुका पोलिसांनी आज न्यायालयात सादर केला. त्यामुळे आजचे कामकाज होऊ शकले नाही. आता डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत समन्स पाठविण्याचा आदेश देण्यात आला असून पुढील सुनावणी ८ नोव्हेंबरला ठेवण्यात आली आहे. पुत्रप्राप्तासंबंधी केलेल्या वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर यांच्याविरूद्ध हा खटला दाखल आहे. खटला रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर संबंधित खटला संगमनेर येथील कनिष्ठ न्यायालयात पुन्हा सुरू झाला आहे. त्याची आज सुनावणी होती.

संगमनेरच्या कनिष्ठ न्यायालयात पुन्हा खटला सुरू झाला. त्याची तारीख शुक्रवारी (१३ ऑक्टोबर) होती. यासाठी न्यायालयाने संगमनेर तालुका पोलिसांमार्फत इंदोरीकर यांना न्यायालयात उपस्थित राहण्यासंबंधी समन्स पाठविले होते. आज या खटल्याची सुनावणी प्रथमवर्ग न्यायाधीश श्रीमती एस. एम. वाघमारे यांच्यासमोर सुरू झाली. तेव्हा इंदोरीकर हजर नव्हते. पोलिसांनी न्यायालयाचे समन्स बजावण्यासाठी इंदोरीकर भेटले नसल्याचा अहवाल सादर केला. यावर मूळ तक्रारदार अड. गवांदे यांनी तालुका पोलिसांना हे काम शक्य होत नसेल तर पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत समन्स पाठविण्यात यावेत, अशी विनंती न्यायालयाला केली. आता न्यायालयाने पुढील सुनावणी ८ नोव्हेंबरला ठेवली असून त्यासाठी पुन्हा इंदोरीकर यांना समन्स पाठविण्यात येणार आहे.

Web Title: Indurikar Maharaj meets the police, the case is adjourned

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here