Home Accident News अहमदनगरमध्ये वाढदिवसाच्या दिवशी दुर्दैवी घटना, रेल्वेच्या धडकेत २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू

अहमदनगरमध्ये वाढदिवसाच्या दिवशी दुर्दैवी घटना, रेल्वेच्या धडकेत २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Breaking News | Ahmednagar Accident: रेल्वे गाडीच्या धडकेत २६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना, वाढदिवसाच्या दिवशीच अपघात.

incident on birthday, 26-year-old dies in train collision Accident

अहमदनगर: नगर – दौंड रेल्वे मार्गावर अकोळनेर (ता.नगर) गावच्या शिवारात रेल्वे गाडीच्या धडकेत २६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.६) पहाटे घडली. देविदास भानुदास मेहेत्रे उर्फ बाबु (रा. जाधववाडी, अकोळनेर, ता.नगर) असे अपघातातील मृत तरुणाचे नाव आहे.

मयत देविदास हा टँकर चालक होता, तो अविवाहित होता. त्याचा सोमवारी (दि.५) वाढदिवस होता. रात्री त्याने मित्रांसमवेत वाढदिवसही साजरा केला. त्यानंतर रात्री अकोळनेर शिवारात भारत पेट्रोलियम डेपोच्या जवळील रेल्वेलाईनचे कडेला तो गंभीर जखमी अवस्थेत मिळून आल्याने त्यास खाजगी अॅम्बुलन्स चालक अक्षय दशरथ पाचारणे (रा. केडगांव) याने पहाटे ४.४० च्या सुमारास नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचाराकरीता दाखल केले असता तो औषधोपचारापुर्वीच मयत झाल्याचे मेडीकल ऑफिसर डॉ. कोल्हे यांनी घोषित केले.

मयत देविदास याच्यावर दुपारी अकोळनेर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. एका अवघ्या २६ वर्षाच्या तरुणाचा वाढदिवसाच्या दिवशी रात्रीच असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबतची माहिती जिल्हा रुग्णालयातील दवाखाना डयूटीवर असलेले तोफखाना पोलिस ठाण्याचे स.फौ. जठार यांनी नगर तालुका पोलिसांना दिली. तालुका पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.हे.काँ. लगड हे करीत आहेत.

Web Title: incident on birthday, 26-year-old dies in train collision Accident

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here