Home महाराष्ट्र अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य

अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य

Solapur Crime: शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीवर विनयभंग (Molested) केल्याची संतापजनक घटना.

incident of the teacher molesting a minor student

सोलापूर: एका नामांकित शाळेत शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीवर विनयभंग केल्याची संतापजनक घटना सोलापुरात घडली आहे  दोन वर्षांपूर्वी अल्पवयीन विद्यार्थिनीला शिक्षकाने प्रपोज करत मला सोडून जाऊ नकोस अन्यथा मी काहीतरी बरे वाईट करून घेईन अशी धमकी देत मानसिक त्रास दिला .विद्यार्थिनीने नकार दिल्यानंतरही हा शिक्षक तिचा सतत पाठलाग करत होता . या शिक्षकाची हिम्मत एवढी वाढली होती की विद्यार्थिनीचा हात धरत जबरदस्तीने घेऊन जात तिच्याशी जवळीकता साधण्याचा शिक्षकाने प्रयत्न केला . पीडित मुलीच्या फिर्यादीवरून शिक्षकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय .आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.

सोलापुरातील एका नामांकित शाळेतील शिक्षकानेच अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.पीडितेने दिलेल्या फिर्यादवरून सोलापुरातील एका नामांकित शाळेतील शिक्षकाविरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.’मला सोडून जाऊ नकोस, अन्यथा मी काहीतरी बरेवाईट करून घेईन’, अशी धमकी देऊन मानसिक त्रास दिल्याचे फिर्यादमध्ये म्हटले आहे. शिक्षकाने जुलै 2023 मध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीला संवाद साधून प्रपोज केले. विद्यार्थिनीने नकार दिल्यानंतरही हा शिक्षक सतत पाठलाग करत होता. जानेवारी 2024 मध्ये हात धरून जबरदस्तीने घेऊन जाऊन तिच्याशी जवळीकता साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पोस्को कलम 12 सह भारतीय न्याय संहिता कलम 74, 78, 351 (2) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आली आहे.

Web Title: incident of the teacher molesting a minor student

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here