विवाह नोंदणी संकेतस्थळावर ओळख, तरुणीवर तब्बल पाच वर्ष बलात्कार

    Breaking News | Pune Crime: विवाह नोंदणी संकेतस्थळावरून झालेल्या ओळखीतून तरुणीवर तब्बल पाच वर्ष अत्याचार (raped) करण्यात आल्याची घटना उघडकीस.

    Identification on marriage registration website, young woman raped 

    पुणे: राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी सरकार आणि पोलीस प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात असताना पुण्यातून धक्कादायक माहिती समोर आली. विवाह नोंदणी संकेतस्थळावरून झालेल्या ओळखीतून तरुणीवर तब्बल पाच वर्ष अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पीडित महिलेने कोंढवा पोलिसांत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

    रचित संतोष गोयल (वय, ३४) असे आरोपीचे नाव असून तो घोरपडी येथील कवडे रस्ता येथील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने तो विवाहित असल्याची बाब लपवून विवाह नोंदणी संकेतस्थळावर नाव नोंदवले. एका विवाह नोंदणी संकेतस्थळावर पीडित महिलेची आरोपीशी ओळख झाली. त्यानंतर आरोपी आणि पीडिता यांच्यातील जवळीक वाढली. पुढे आरोपीने पीडिताला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. पीडिता गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतर पुन्हा तिच्यासोबत शाररिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. पीडिताने नकार दिल्यानंतर आरोपीने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. हा संपूर्ण प्रकार एप्रिल २०१८ ते डिसेंबर २०२३ दरम्यान घडला.

    Web Title: Identification on marriage registration website, young woman raped 

    See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Stud

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here